जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा राडा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा रुग्णालय मागील काही वर्षांपासून नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. दोनच दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख असलेल्या सिव्हील सर्जनच्या दालनात भांडणे झाली. त्यानंतर आज वरिष्ठ डाॅक्टराच्या दालनात पुन्हा कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. यामुळे रुग्णालयात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील पाच सुरक्षा रक्षक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एकत्र जेवायला बसले. दरम्यान, त्यांचा मुकादम असलेले कायम स्वरुपी कर्मचारी त्या पाच जणांना असभ्य भाषेत बोलू लागला. हा विषय वरिष्ठ डाॅक्टरच्या दालनात पोहचला. त्यांच्या दालनात मुकादम आणि सुरक्षारक्षक यांचा शाब्दिक चकमक झाली. काही वेळात त्याचे पर्यावसन हाणामारीत झाली. सुरक्षारक्षकाने मुकादमला चोप दिल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी काम बंदची हाक दिली. दरम्यान, हा विषय जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या दालनात पोहचला. मात्र, त्यांनी हात वर केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

error: Content is protected !!