सिव्हिल सर्जन अमोद गडीकर यांची बदली


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा):   जिल्हा शासकीय रुग्णालयात आढळलेले मृत भ्रूण प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवरून त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी होत होत्या. आज रविवारी कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे कराड येेथे आले असता त्यांच्यासमोर अनेकांनी सिव्हिल सर्जन गडीकर यांच्याबद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचला. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी गडीकर यांची बदली करत असल्याचे सांगितले.

गडीकर यांच्या कामाच्या पद्धतीमुळे सिव्हिल मधील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांंमध्ये असंतोष निर्माण झाला होता. काही मोजक्या डॉक्टरांना सोबत घेऊन ते सिव्हिलचा कारभार पाहत असल्याचा आरोप सिव्हिलमधीलच डॉक्टर करत होते. अशा प्रकारच्या वारंवार तक्रारी त्यांच्याबाबत होऊ लागल्या होत्या. त्यातच चार दिवसांपूर्वी सिव्हिलमधील शौचालयामध्ये मृत अर्भक सापडले. त्यामुळे खळबळ उडाली होती. हे प्रकरण संवेदनशील असतानाही गडीकरांना यातील काहीच माहीत नसल्याचे बोलले जात होते. तथापि, त्यांच्या कार्यपद्धतीवरुन गदारोळ सुरु झाला. अखेर डॉ. गडीकर यांच्या बदलीचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.
error: Content is protected !!