एकनाथ शिंदे सहकुटुंब महाबळेश्वरात दाखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब महाबळेश्वरला विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा खासगी दौरा असल्याने महाबळेश्वरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री उशीरा महाबळेश्वरला दाखल झाले. ते दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर सहकुटुंब महाबळेश्वरात दाखल झाले आहेत. हा खासगी दौरा असल्याने ते कोणालाही भेटणार नाहीत. तसेच पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

error: Content is protected !!