पाणीदार गावांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दुष्काळावर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाणी फाउंडेशन, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा उपक्रमात अनेक दुष्काळी गाव पाणीदार झाली. या गावांची जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पाहणी केली.

कोरेगाव तालुक्यातील वेळू, न्हावी बुद्रुक व खटाव तालुक्यातील वरुड या गावात “सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा – २०१९” (पाणी फाउंडेशन)च्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली, यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पाणी फाऊंडेशनचे  प्रमुख मार्गदर्शक डाॅ.अविनाश पोळ, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आबा लाड, राहुल भासल, जितेंद्र शिंदे, दयानंद निकम, अजित जगदाळे कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, गटविकास आधिकारी क्रांती बोराटे, खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार आदींची उपस्थिती होती

यावेळी वेळू गावाने केलेला तलाव जोड प्रकल्प, अटल आनंदघन वन योजनेतील वृक्षारोपण आणि न्हावी बुद्रुक येथील मियावाकी जंगलाची पाहणी केली. वरुड गावाने  श्रमदानातून केलेल्या जलसंधारण चे काम सीसीटी बंधारे पाहण्यात आले,मनरेगा मधून ग्रामपंचायत च्या गायरान जमिनीवर केलेली वृक्ष लागवड पाहण्यात आली. या मध्ये वरुड करांनी केशर आंबा या रोपांची लागवड केली आहे यामुळे भविष्यात ग्रामपंचायत चे उत्पन्न वाढेल ही संकल्पना आहे ,याचबरोबर पाझर तलावाची देखील पाहणी करण्यात आली. लोकसहभागातून व CSR फंडातून पाझर तलाव अगदी कमी पैशात दुरुस्त करून त्या मध्ये कटला, रुहु या प्रकारचे मासे देखील गावाने सोडले आहेत, याची पाहणी केली.

गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात सर्व ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी संवाद साधला व गावातील सर्व लोकांना समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले आणि आपण सर्वजण मिळून हे काम पुढे नेऊ असा विश्वास ग्रामस्थांना दिला.

error: Content is protected !!