सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – दहिवडी शहरातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी दहिवडी प्रतिबंधात्मक क्षेत्र असणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालये तसेच कॉलेजेस बंद करण्यास सांगितले आहे. तसेच स्थानिक अस्थापना देखील बंद करण्यास सांगितले आहे. वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण दहिवडी शहराची खबरदारी घेत संपर्कात आलेल्याची टेस्ट करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्धन कासार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, माणच्या तहसीलदार बाई माने, खटावचे तहसीलदार किरण जमदाडे, दोन्ही तालुक्याचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
शेखऱ सिंह म्हणाले,
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कोरोनाशी कसा लढा द्यायचा हे आपण शिकलो आहोत. मात्र गेल्या काही महिन्यात काही लोकांनी थोडा निष्काळजीपणा केल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. यात सर्वांना दोष देता येणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की मास्क योग्य पध्दतीने वापरा, संरक्षित अंतर ठेवा व हात स्वच्छ धुवा. दहिवडीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेवून आपण शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. संपुर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यामागील भावना लोकांनी समजून घ्यावी. सारी, कोरोनाचा प्रसार इतरत्र होवू नये म्हणून आपण ही काळजी घेत आहोत.
कोणत्याही कारणासाठी कोणीही कन्टेंटमेंट झोनच्या बाहेर जावू नये. मग ते शिक्षक असोत वा शासकीय कर्मचारी. कन्टेंटमेंट झोनमधील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना बंद राहतील. शासकीय कार्यालयात फक्त अंतर्गत कामकाज सुरु राहील बाहेरील कोणीही तिथे येणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या मंगल कार्यालयाच्या मालकांवर पहिल्यावेळी पंचवीस हजार रुपये तर दुसऱ्या वेळी एक लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. लग्न मालकाला दहा हजार रुपये तसेच लग्नात मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड तसेच फौजदार कारवाई करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे
You must be logged in to post a comment.