कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : आ. शिवेंद्रसिंहराजे

परळी ता. सातारा येथे कोरोना मदत केंद्राचे उदघाटन करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी राजू भोसले, सौ. सरिता इंदलकर, अरविंद जाधव, सौ. विद्या देवरे व इतर .

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन धोक्यात आले आहे. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. आपला देश कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

परळी ता. सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वयंम सामाजिक संस्था सातारा आणि सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या कोरोना मदत केंद्राच्या (सातारा शहर व तालुका मर्यादित) उदघाटनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, सदस्य सौ. विद्या देवरे, स्वयंम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनोज विभुते, कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, सरपंच निकम, परळी आरोग्य केंद्राचे डॉ. यादव, सर्व कर्मचारी उपस्थित होते. 


या कोरोना मदत केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे, कोरोना तपासणीबद्दलचे गैरसमज दूर करणे, बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करणे, लसीकरणाबद्दल माहिती देणे व जनजागृती करणे, भागात बेडची उपलब्धता जाणून घेणे आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 
कोरोना मदत केंद्रामुळे ग्रामस्थांना कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शन तर होईलच पण, बाधित रुग्णांनाही याचा निश्चित फायदा होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने घरातच थांबणे आवश्यक आहे. विनाकारण बाहेर न फिरणे, गर्दी न करणे, मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे याचे काटेकोर पालन झाल्यास आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या बाबींचे पालन करून स्वतःचे आणि कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.  

error: Content is protected !!