मंत्री शंभुराज देसाई यांच्या जनता दरबारात तक्रारीचे जागेवर निपटारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या जनता दरबारात तब्बल 353 लेखी निवेदनापैकी बहुतांशी निवेदनांचा जागेवरच निपटारा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या जनता दरबारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टॉप प्रायोरिटीने दखल घेत अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या आत सदर निवेदनांची कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा ही मंत्री देसाई यांनी संबधित शासकीय विभागांना दिला आहे.

पाटण येथे तहसीलदार कार्यालय प्रांगणात झालेल्या जनता दरबारास जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय बन्सल, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, तहसीलदार रमेश पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, सुरेश पानस्कर, भरत साळूंखे, अभिजित पाटील,बबनराव भिसे,विजयराव जंबुरे,बशीर खोंदू,बबनराव माळी,सुरेश जाधव, सदानंद साळुंखे तसेच आरोग्य,बांधकाम, शिक्षण,वन,परिवहनसह विविध शासकीय विभागातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनता दरबार उपक्रमास नागरिकांमधून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. विविध शासकीय पातळीवर प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची जनता दरबारात जागेवरच सोडवणूक होत असल्याने या दरबाराला तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमधून अनन्य साधारण महत्व आहे. दरम्यान कोविड काळामुळे दोन वर्षे पाटण तालुक्यतील जनता दरबार रखडला होतामात्र मंगळवारी पुन्हा पाटण तालुक्यातील मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मंत्री पदाच्या काळातील पहिला आणि आजपर्यंतचा पाचवा जनता दरबार संपन्न झाला.

error: Content is protected !!