सिध्दनाथ देवस्थानच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “श्री सिध्दनाथाच्या नावांन चांगभल”च्या गजरात गुलाल खोब-याची उधळण करीत भाविकांनी म्हसवडातील श्री सिध्दनाथ देवस्थानच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज (रविवार) देवदिवाळीस दुपारी साडेबारा वाजता रथ मिरवणूकीने झाली.

‘श्रीं’ चे उत्सव मुर्ती रथावर स्थानापन्न करुन पारंपारिक मार्गाने रथ मिरवणूक न काढता फक्त यात्रा मैदानातच रथाची फेरी मारावी आणि पुर्ववत जागी रथ दोन तासांत आणण्याची प्रशासन पातळीवर परवानगी घेतली.

त्यानूसार सकाळी साडे अकरा वाजता मंदीरातील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरीच्या सालकरी कृष्णात गुरुव यांच्या निवासस्थानी स्थापन्न केलेल्या मुर्तीची आरती करुन या मुर्ती पालखीत स्थानापन्न करुन हि पालखी मिरवणूकीने यात्रा मैदानात चारी बाजूंनी बॅरेगेट लावून बंदीस्थ केलेल्या रथात दुपारी साडेबारा वाजता सालकरी कृष्णात गुरुव यांच्या समवेत स्थानापन्न करण्यात आल्या.

यावेळी रथाचे मानकरी अजितराव राजेमाने , पृथ्वीराज राजेमाने, गणपतराव राजेमाने, सयाजी राजेमाने व इतर रथाचे मानकरी रथावर चढताच श्रीफळ वाढवून रथाची नगरप्रदक्षणा मिरवणूक रद्द करुन फक्त सुमारे दोनशे फुट अंतरावर ओढीत पारंपारिक रथ मिरवणूकीची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!