सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ठाकरे कुटुंबीयांवर रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना कऱ्हाड तालुक्याच्यावतीने निषेध करण्यात आला. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रामदास कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद-पाटील, दक्षिण तालुका प्रमुख शशिकांत हापसे, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, युवा सेना शहर संघटक अक्षय गवळी,दिलीप यादव, शहाजीराव जाधव, संजय चव्हाण, माणिक आथरकर, ऋषिकेश महाडिक, संदीप पाटील, कविता यादव, शोभा लोहार, प्रेमलता माने, प्रतिभा नाईक, विभाग प्रमुख महेश पाटील, प्रवीण लोहार अनिल चाळके महेश भावके, ओमकार काशीद पाटील, बापू भिसे ,कृष्णात बोडरे, विद्यानंद पाटील आदी उपस्थित होते
You must be logged in to post a comment.