सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसत आहे. सतत सुरु असलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर काँग्रेस कमिटीकडून निदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ तातडीने मागे घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
You must be logged in to post a comment.