महागाईच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला बैलगाडी मोर्चा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कॉंग्रेसने महागाईच्या विरोधात कराड येथे काढलेली रॅली आज उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला.

काँग्रेसतर्फे आजपासून महागाई विरोधात जनजागरण अभियान सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, शहराध्यक्ष राजेंद्र माने,  यांच्याह महिला उपस्थित होेते. कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. मुक्या बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वळसा घालून रॅलीचा समारोप येथील तहसीलदार कार्यालयसमोर झाला. तेथे जाहीर सबेत रूपांतर झाले.

error: Content is protected !!