इंधन दरवाढीविरोधात वडूजमध्ये काॅंग्रेसची सायकल रॅली

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात खटाव तालुका काॅंग्रेसच्यावतीने वडूजमध्ये सायकल रॅली काढून निषेधही करण्यात आला. यावेळी प्रदेश कॉग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख , जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश गुरव उपस्थित होते.       

महागाई विरोधात व केंद्र शासनाच्या चूकीच्या धोरणाविरोधात खटाव तालुका राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने वडूज येथील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयावर सायकल सह निषेध मोर्चा काढण्यात आला.  यावेळी  कृषी उत्पन बाजार समितीचे  माजी चेअरमन अशोक गोडसे, संजीव साळुंखे, डॉ. संतोष गोडसे,  राजेंद्र खाडे, विजय शिंदे, सचिन घाडगे, अर्जून गोडसे, मोहन काळे, अँड. संतोष भोसले, श्रीरंग देवकर, परेश जाधव, प्रकाश देवकर, संतोष मांडवे,दाऊद मुल्ला, टिलू बागवान यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

error: Content is protected !!