फलटण, (भूमिशिल्प वृत्तसेवा)- फलटण तालुका काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांचा नूतनीकरणासाठी काढलेला पुतळा पुन्हा त्वरित बसविण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना गुलाबपुष्प देऊन निवेदन देण्यात आले.
फलटण तालुका व शहर राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना गजानन चौकातील महात्मा गांधींचा नुतनीकरणासाठी काढलेला पुतळा लवकरात लवकर बसवावा यासाठी गांधीगिरीच्या मार्गाने गुलाबपुष्प व निवेदन दिले
याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके, कार्याध्यक्ष अमिरभाई शेख,शहर अध्यक्ष पंकज पवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रितम जगदाळे,अनूसुचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर,अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष ताजूभाई बागवान, शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दिपक शिंदे ,शरद सोनवणे, अच्युत माने,रिंकू शिंदे, अभिजित जगताप, नितीन जाधव,अनिल खोमणे, चंद्रकांत पवार,जालिंदर गायकवाड,सोपानराव जाधव आदी उपस्थित होते
You must be logged in to post a comment.