काँग्रेसच्या सत्तेत सर्व भकास,महायुतीने केलं झकास : उदयनराजे

तारळे येथील सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा घेतला समाचार

तारळे,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाविकास आघाडीने पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भकास परिस्थिती निर्माण केली होती. मात्र महायुतीच्या आमदारांनी सगळं काही झकास करून टाकलं, असे उद्गार महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले. दरम्यान खोटं बोलण्यापेक्षा वस्तूस्थिती लक्षात घ्यावी असा समाचार देखील त्यांनी घेतला.

तारळे येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या आजी-माजी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते .याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, अभिजीत पाटील, संजय देशमुख, रामभाऊ लाहोटी, प्रवीण उदुगडे,नितीन जाधव,रवी लाहोटी, सुनील काटकर,विजय पवार, जयवंत शेलार,सोमनाथ खामकर,विकास जाधव, एम.डी जाधव आदींची उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, नुकतीच या भागात महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा झाली त्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करण्यात आली. वास्तविक वस्तूस्थिती काय आहे याचा विचार करायला पाहिजे. देसाई यांनी या परिसराचा कायापालट केला आहे. काँग्रेस नेत्यांना काही करता आलं नाही म्हणून तर जनतेने परिवर्तन घडवून आणले.

शंभुराजे देसाई म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय लोक सोबत येत नसतात. तारळे परिसराचे देसाई घराण्याशी चार पिढ्यांच नातं आहे. मागे सत्ता नसतानाही पाच वर्ष मी थांबून राहिलो नाही. आता दहा वर्षापासून विरोधकांकडे सत्ता नाही, पण ते लोकांच्या कामासाठी फिरकत देखील नाहीत. निवडणूक आली की लोकांच्या समोर जाऊन उभे राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर द्या असे आम्हाला सूचित केले आहे. आम्ही तेच करत राहणार. तारळी वरील वीज प्रकल्पाबाबत विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत, लोकांच्या संमतीशिवाय या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येणार नाही.

पंचायत समितीचे माजी सदस्य बबन शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा झाली. पालकमंत्री यांनी तडफेने काम करत सिंचन प्रकल्प मार्गी लावले आहे. तारळी प्रकल्पाचे केवळ उद्घाटन करून थांबलेल्या देसाई विरोधकांनी उजेड पाडला नसता तर डोंगरापर्यंत पाणी गेले असते.

माजी सभापती शिवाजीराव खामकर यांचा देसाई गटात प्रवेश 

पाटण पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव खामकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई यशराज देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!