सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सुपर मार्केटमधील वाईन विक्री विरोधातील आंदोलनादरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने साताऱ्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहर ठाण्यात बंडातात्यांविरोधात दुसरा गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी समिंद्रा जाधव (रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि बदनामी केल्याप्रकरणी ५०० आणि ५०९ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव आहेत. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ३ फेब्रुवारी रोजी साताऱ्यात सुपर मार्केटमधील वाईन विक्रीला परवानगी देऊ नये, याासाठी विलासबाबा जवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान, दुपारी १२ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकांना संबोधित करताना बंडातात्या कराडकर यांनी सगळ्या पुढाऱ्यांची मुले दारु पितात तसेच काही महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे महिलांचा अपमान झाला आहे. तसेच त्यांची बदनामी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दलही बदनामीचे वक्तव्य केले आहे.
You must be logged in to post a comment.