काँग्रेसचे भाजपविरोधात माफी मांगो आंदोलन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे कोरेगावमध्ये निदर्शने करण्यात आले.

 यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कार्याध्यक्ष विजयराव कणसे, तालुका अध्यक्ष विक्रांत चव्हाण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदीजी माफी मांगो अशा घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत.

error: Content is protected !!