सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात सातारा काँग्रेसने आज तीव्र आंदोलन केले व सातारा शहर येथील पोलीस ठाण्यात तक्रार देत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
‘भारताला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. त्यावरून देशभरात पडसाद उमटत असून साताऱ्यात आज काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रदेश काँग्रेसचे सदस्य रजनी पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.