सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मायणी येथील मयत इसमाची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले आमदार जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. गोरे यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी नऊ जूनला होणार असून तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
गोरे यांनी अटकपूर्व जामीन आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने ते आदेश दिले. खटाव तालुक्यातील मायणी येथील मागासवर्गीय समाजातील पिराजी भिसे या मृत व्यक्तीच्या नावे असलेली जमीन हडप करण्याचे हेतूने गोरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे, दस्तऐवज तयार केली. भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार गोरे यांच्यासह सहजणांवर दहिवडी पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आमदार गोरे नॉट रिचेबल आहेत.
You must be logged in to post a comment.