सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोहिते यांचे नुकतेच निधन झाले. शनिवारी त्यांच्या कुटुंबियांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेवून सांत्वन केले. यावेळी दिलदार कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली.
संजय मोहिते यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. शिवसेना कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती. शिवसेनेचे नेते व विद्यमान नगरविकास मंत्री शिंदे व शिवसेना नेते दगडू सकपाळ यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मंत्री शिंदे यांनी संजय मोहिते यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना धीर दिला.
यावेळी माजी आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना आमदार महेश शिंदे, कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवसामर्थ्य सेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद वेर्णेकर, सांगली जिल्हाप्रमुख संजय पवार, शशिकांत हापसे, शशिराज करपे, अक्षय गवळी, दिलीप यादव, महेश पाटील, संजय चव्हाण आंच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.फोटो कॕप्शनजिल्ह्याचे संपर्क प्रमुख दिवंगत संजय मोहिते यांच्या कुटुंबियांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आगाशिवनगर येथे भेट घेवून सांत्वन करून मीहिते यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
You must be logged in to post a comment.