कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासदार पाटलांकडे साकडे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बीएएमएस अर्हताधारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाºयांच्या पुनर्नियुक्तीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच आरोग्यमंत्र्यांकडे याबाबत शिफारस करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे कंत्राटी डॉक्टरांच्या पुनर्नियुक्तीचा आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

कोरोना कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावणाºया कंत्राटी बीएएमएस अर्हताधारक डॉक्टरांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश बहुतांश डॉक्टरांना प्राप्त झाले आहेत. मात्र, कंत्राटी डॉक्टरांना सेवामुक्त करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगुन तदर्थ वैद्यकीय अधिकारी संघटनेने पुनर्नियुक्तीची मागणी करीत लढा सुरू केला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनीही याची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली.

तदर्थ वैद्यकीय अधिकाºयांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दरमहा नियमित मानधन मिळत नसतानाही जनतेला आरोग्य सेवा देण्यात मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन व तिसºया कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी या तदर्थ वैद्यकीय अधिकाºयांच्या उपयोग करून घेता येईल. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त न करता पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. मात्र, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती झाल्याने तदर्थ वैद्यकीय अधिकाºयांसाठी पदे उपलब्ध नाहीत, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी स्पष्ट केले. अखेर तदर्थ वैद्यकीय अधिकाºयांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ‘वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट ब’ अशी नवीन पदनिर्मिती करून कायमचा प्रश्न सोडण्याचे निर्देश खासदार पाटील यांनी दिले असून हा प्रश्न नियोजन मंडळामध्ये उपस्थित करून आरोग्य मंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

error: Content is protected !!