कोवीड रुग्णालयातील डाॅक्टरांचा संपाचा इशारा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा कोवीड रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी डाॅक्टरांपैकी काही डाॅक्टरांना कामावरून कमी केले आहे. या निषेधार्थ मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने संपाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेेेदन देण्यात आलं आहे.

मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हा कोवीड रुग्णालयाच्यावतीने रुबी एलीकेअर प्रा. लि. या कंपनीने कोवीड रुग्णालयात काम करणाऱ्या डाॅक्टरांना कामावरून कमी केले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय़ कमी आहे. त्यामुळे कमी केलेल्या डाॅक्टरांना पुन्हा रुजू करण्यात यावे. अन्यथा मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!