सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजुला पडला आहे, शेतक-यांपेक्षा स्वत:चा स्वार्थ साधण्याचा सध्या सुरु असलेल्या अनेक प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही त्याचा बंदोबस्त करु असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदार संघातील मतदार सभासद-कार्यकर्त्यांचा मेळावा सातारा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते.
व्यासपीठावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, सौ.गितांजली कदम, कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, पंचायत समितीचे महाबळेश्वर माजी सभापती विजयराव भिलारे, कराडचे प्रा.आर.के.पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, सौ.रत्नमाला निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकच्या माध्यमातुन होसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या आग्रह आणि इच्छेनुसार आम्ही याच मतदार संघातुन बँकची निवडणुक लढण्याचे निश्चित केले आहे.
अलिकडच्या काळात सहकाराच्या माध्यमातुन शेतकरी सभासदांच्या हिताचे उपदेश दयायचे आणि करायचे मात्र स्वतःच्या फायदयाचे ही भावना शिरली. अनेक संस्था याच घातक स्वाहाकारी विचारातुन खाजगी झाल्या. सहकाराचे नेतृत्व व्यक््तीकेंद्रीत झाले. परिणामी अनेक संस्था,बॅन्का अवसायानात गेल्या. त्या संस्थांवर अवलंबुन असलेल्यांचे हाल झाले. खरंतर ज्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली त्यांची पदे रदूद केली गेली पाहीजेत. त्यांना कोणत्याही संस्थांचे सभासद-संचालक म्हणून देखिल निवडणुक लढवण्यास बंदी केली गेली पाहीजे.
आपल्या विचारांची संस्था नाही तर मग त्यांचे निवडणुकीतील मताचे ठराव अवैध ठरवुन, संकुचित वृत्तीने सहकार क्षेत्र आज वाकवले जात आहे. मताला अवैध ठरवलेल्यांना अवैध
ठरवण्यापूर्वी संधी सुध्दा दिली नव्हती. त्याचा खेद वाटतो. ज्यांचे मतदानाचे ठराव अवैध ठरवले गेले. त्यांनी असं कोणतं पाप केले होते, त्यांनी कुणासारखा भ्रष्टाचार केला नव्हता किंवा त्यांची ईडीची चौकशी लागली नव्हती. परंतु फक्त आपल्या विचारांचा नाही म्हणून मतदानाला अपात्र हा पवित्रा आम्ही हाणुन पाडला. अश्या प्रकारचा कोणताही अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करु शकत नाहीत, त्याचा योग्य पध्दतीने सनदशीर मार्गाने बंदोबस्त करण्यास आम्ही आता मागे पुढे पहाणार नाही असे नमुद केले.
You must be logged in to post a comment.