सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या पुढे गेले आहे. तर बाधित रुग्णांचा मृत्यू दरही वाढला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1184 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 22 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आलेख चिंता वाढवणार आहे. साधारण गेल्या महिन्यापासून दररोज रुग्णांची संख्या ही वाढतच असून त्यामुळे आरोग्य प्रशासनावर ताण आला आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावही हाॅटस्पाॅट बनली आहेत. तेथील वाढता संसर्ग रोखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने मास्क, सॅनिटाईझर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासन टेस्टिंग आणि लसीकरण या दोन्ही गोष्टींवर भर देत आहेत. मात्र, वाढती संख्या आणि अपुरी यंत्रणेमुळे चिंता वाढली आहे.
You must be logged in to post a comment.