सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यात प्रभाग क्र. १९ मधील नागरिकांसाठी नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्यातर्फे कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात शेकडो नागरिकांना लस देण्यात आली.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार साताऱ्यात कोविडं -१९ अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे .या अंतर्गत सध्या सातारा जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात लसीकरण करण्यात येत आहे. सातारा शहरात प्रभाग १९ मध्ये नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम राबवली.
या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी सामाजिक अंतर राखून, मास्क लावून आणि कोविडचे नियम पाळून लसीकरण केले. यावेळी ढोणे म्हणाले, नागरिकांनी लसबाबत मनातील भीती दूर करून स्वतःसोबत इतरांनाही सुरक्षित करावे.
You must be logged in to post a comment.