सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात आठवड्याभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे.सातारा जिल्ह्यात रोज दीड हजार नवीन रुग्णांची भर पडत असून आज १२१२ जण कोरोना बाधित आढळले तर तब्बल ४१ बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान,जिल्ह्यात सद्यस्थितीत १३ हजार ८५२ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ सातारामध्ये देखील कोरोनाचा उद्रेक वाढला असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन जारी केला असून सातारामध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, या निर्बंधामधून उद्योग, वाहतूक यांना सूट देण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार विकेंड ला कोरोना नियम अधिक कडक करण्यात आले असून. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असून आतापर्यंत 82 हजार 955 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 66 हजार 948 जण उपचार घेऊन घऱी परतले आहेत. असून आता पर्यंत 2 हजार 155 जणांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा रुग्णालय, जम्बो कोवीड हाॅस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण व प्राथमिक रुग्णात कोरोना बधितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागामार्फत सर्व सुविधा सुरळीत सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, कुठल्याच रूग्णालयामध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती असून बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याचे चित्र आहे.
कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडिसिव्हर मिळण्यासाठी फार्मा स्टोर बाहेर रीघ लागली आहे. काही ठिकाणी रेमडिसिव्हरचा काळाबाजार होत असल्याने कृत्रिम टंचाई होत असल्याचं चित्र आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून रोज कोरोनामुळे 30 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. काही वेळा मृतदेह वाढल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी अग्निकुंड मिळत नसल्याने स्मशानभूमीत जमिनीवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
You must be logged in to post a comment.