सेवामुक्त कोरोना योध्द्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्‍यता असतानाच शासनाने आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवामुक्त केले आहे. यासह अन्य मागण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ८०० कंत्राटी कर्मचारी यामुळे बेरोजगार झाले आहेत. शासनाच्या विरोधात कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेने एल्गार पुकारला आहे. कोरोना योद्धे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह कोविड हॉस्पिटल आणि कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. येथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले होते. या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय दि. ३१ ऑगस्टपासून घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात अशाप्रकारे कार्यरत असणारे सुमारे ८०० कर्मचारी यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोरोना काळात जीवावर उधार होऊन काम करणाऱया कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत घ्यावे. शासनाने जाहीर केलेला कोविड भत्ता तात्काळ कर्मचार्‍यांना देण्यात याबा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!