कोरोना रुग्णाला मदत… हाकेच्या अंतरावर !

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कुणाला ऑक्सिजन बेड हवा, कुणाला व्हेंटिलेटर, कुणाला रेमडीसीवीर, तर कुणाला आणखी काही….

त्यामुळंच वॉर्ड क्रमांक 7 मधल्या नागरिकांसाठी नगरसेवक बाळू खंदारे यांनी सुरू केलीय हेल्पलाईन! कोरोनासाठी लागणाऱ्या औषध, बेड व ऑक्सिजन आदींसाठी आता फक्त फोन करा आणि हक्कानं मदत मागा, असं आवाहन खंदारे यांनी केलंय.

नगरविकास आघाडीचे नगरसेवक असणाऱ्या बाळू खंदारे यांनी या सेंटरच्या माध्यमातून अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येक कोरोनाबाधित पेशंटला डाॅक्टरांची होम व्हिजिट, तज्ज्ञ डाॅक्टरांचे व्हिडीओ काॅलद्वारे मार्गदर्शन, लॅब टेक्निशियनद्वारे घरी येऊन तपासणी, सॅम्पल कलेक्शन करण्याची सुविधा, पेशंटला गरज असल्यास हाॅस्पिटलमध्ये बेड, प्रत्येक कुटुंबास एक एसपीओ२ मॉनिटर, एक थर्मामीटर व सर्व औषधे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाबाधित पेशंटला मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी 7304101101 व 9657717273 हे दोन क्रमांक दिले असून, कोरोनाबाधित रुग्ण आणि नातेवाईकांनी केव्हाही या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक खंदारे यांनी केलंय.

error: Content is protected !!