सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा कधी 300 चा आकडा ओलांडत आहे. तर कधी ती 100 च्या आसपास येत आहे. शनिवारी अचानक 327 चा बाधितांचा आकडा समोर आल्यानंतर स्थिती चिंताजनक झाली असताना रविवारच्या कोरोना अहवालात बाधितांची वाढ मंदावली. रविवारी 133 जणांचा अहवाल बाधित आला असून यामध्ये सातारा, फलटण, कोरेगावात रुग्ण संख्या अधिक आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील एकट्या अरबवाडी गावात 21 बाधित समोर आले आहेत.
जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. ज्या गावांमध्ये बाधीत आढळले आहेत तिथे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच बाधित असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यातील लोकांना होम क्वाॅरंन्टाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या गावातील लोकांचे नमुने तपासण्यात आले आहेत.
You must be logged in to post a comment.