जिल्ह्यात आणखी 18 जणांना बाधा

जिल्ह्यातील 47 जण पुन्हा आपापल्या घरी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 28 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 649 इतकी झाली आहे
कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी 5, वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1, बोरीव 1 जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1, खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1, महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1, माण तालुक्यातीन वडजल येथील 3, भालवडी येथील 1 असे 18 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज सोमवारी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली.  

252 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 29, शिरवळ 20, कराड 53, फलटण 22, कृष्णा मेडिकल कॉलेज 37, वाई 73, रायगाव  7, मायणी 1, बेल एअर पाचगणी येथील 10 असे एकूण 252 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील 47 जण पुन्हा आपापल्या घरी
विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेले 47 जण आज  (सोमवार) पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या आता 364 झाली आहे.कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे दाखल असणारे 18, सह्याद्री हॉस्पिटल (कराड) येथील 10, कोरोना केअर सेंटर (खावली) येथील 6, बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथील 5 व मायणी मेडिकल कॉलेज येथील 8 अशा एकूण 47 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 




error: Content is protected !!