सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : शहरात लॉकडाउनमध्येही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस थेट करोना टेस्ट करत असून, अनेकजण पॉजिटिव्ह आढळून आल्याने, पोलिसांकडून त्यांच्या हातवार होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. तर, ज्यांना प्रादुर्भाव जास्त आहे त्यांना रुग्णालयात भरती केली जात आहे.
शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रेक द चेन या मोहिमेतंर्गत नियम कडक करण्यात आले असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करोना टेस्ट केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे यात अनेकजण पॉझिटिव्ह आढळत आहेत.
नागरिकांना त्याच्या आसपास फिरणाऱ्या व्यक्तींपासून करोनाचा धोका असू शकतो, त्यामुळं प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरून करोनापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि नियमांचं पालन करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.
You must be logged in to post a comment.