आणखी 14 कोरोनामुक्त; एक पॉझिटिव्ह

195 जणांचे अहवाल निगेटिव्ह; 122 जणांचे नमुने तपासणीला
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून 1, पाचगणीच्या बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथून 3, खावली कोरोना केअर सेंटर येथून 1, रायगाव कोरोना सेंटरमधून 2 व वाई ग्रामीण रुग्णालय येथून 4 आणि मायणी मेडिकल कॉलेज येथून 3 अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्वांना (रविवार) दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आणखी एक जण पॉझिटिव्ह
एनसीसीएस (पुणे) कडून शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 196 अहवालांपैकी फलटण तालुक्यातील वडले येथील 52 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उर्वरित सगळे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.
122 जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला
सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 33, शिरवळ येथील 39, कोरोना केअर सेंटर पानमळेवाडी येथील 13, मायणी येथील 21 व महाबळेश्वर येथील 16 अशा एकूण 122 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले. 





ReplyForward
error: Content is protected !!