सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटण तालुक्यातील राजाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर्स , नर्स हे लस देण्यासाठी दुजाभाव करीत असल्याचा आरोप काहींनी करत त्यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला.
राजाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर गावातील लोकांना लस मिळत नाही असा आरोप करत तेथे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व लोकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र यामध्ये तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चूक नसताना त्यांना कोंडल्याने या संपूर्ण घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांना योग्य ती समज द्यावी अशी नागरीकांमधून मागणी केली जात आहे. डाॅक्टर्स नर्स यांना कोंडून ठेवले हे अतिशय चुकीचे आहे या बाबत पत्रकार विचारण्यास गेले असता राजकीय लोकांच्या गुंड प्रवृत्ती असणार्या लोकांच्या दबावामुळे हे घडले असे डाॅक्टरानी सांगितले, तसेच येथील सिसी टीव्ही कॅमेरा तपासून ज्यांनी कोंडले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व आम्हाला न्याय मिळावा असे आवाहन केले.
राजाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डाॅक्टर्स नर्स यांना कोंडून ठेवले यामागे लसीकरण बाबत भोंगळ कारभार तर नाही ना?अशा ही चर्चा केल्या जात आहेत. तर या मागचे झालेले कारण हे लवकरात लवकर शोधावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. फलटण उपविभागीय अधिकारी यांच्या कडून लवकरात लवकर या प्रकरणाची पाहणी करूण राजाळे येथील डाॅक्टर्स नर्स सह नागरीकांना योग्य न्याय देण्यात यावा अशी मागणी ग्रामंस्थाकडून होत आहे.
You must be logged in to post a comment.