सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): मी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जिल्ह्यातील या टप्यातील पात्र लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई व त्यांच्या कुटुंबीयांनी आज (मंगळवारी) स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली.त्यानंतर ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, गृहराज्यमंत्री यांचे फॅमिली डॉक्टर सुरेश शिंदे व डॉ.भास्कर यादव उपस्थित होते.
.
You must be logged in to post a comment.