कोरोनाचा कहर ; 12 जणांचा मृत्यू


दिवसभरात 261 पॉझिटिव्ह ; 53 जण कोरोनामुक्त 

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढत असून एकूण बाधितांची संख्या 6 हजार 200 इतकी झाली आहे. आज  मंगळवारी बारा कोरोनाबाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर आणखी 261 बाधित आढळून आले. दरम्यान, आज 53 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला .

बारा बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे काले ता. कराड येथील 30 वर्षीय महिला, पाटण येथील 54 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 57 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, सोनापूर ता. सातारा येथील 92 वर्षीय महिला, सोमवार पेठ फलटण येथील 56 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय महिला, सांगुर ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, वडगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष तसेच सातार्‍यातील खाजगी रुग्णालयात व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष,  शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय महिला अशा 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

सोमवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
सातारा : कोडोली येथील 56, 28, 50  वर्षीय महिला 36, 34 वर्षीय पुरुष 7,3 वर्षीय बालीका, नागठाणे येथील 45 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, बावधन येथील येथील 65 वर्षीय महिला, गोडोली येथील 21 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, सदरबझार येथील 58 वर्षीय पुरुष, समर्थ मंदिर येथील 38 वर्षीय महिला, न्यु विकास नगर येथील 54 वर्षीय पुरुष, संभाजी नगर येथील 69 वर्षीय महिला, भोंडवडे येथील 47, 70 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 3,10 वर्षीय बालक 15,35,38,63,11  वर्षीय महिला 55,39 वर्षीय पुरुष, बेलवडे बु. 82 वर्षीय पुरुष, वाढे 65 वर्षीय महिला,यादवगोपाळ पेठ 32 वर्षीय पुरुष, सदरबझार 45 वर्षीय पुरुष, सातारा येथील 35 वर्षीय पुरष, चिमणपुरा पेठ 27 वर्षीय महिला, कोंढवली येथील 55 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय महिला. कराड : कराड येथील 62,27,29 वर्षीय पुरुष, कार्वेनाका 25 वर्षीय पुरुष, सैदापुर 25 वर्षीय महिला, कार्वे येथील 20 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 43 वर्षीय महिला,शारदा क्लिनिक येथील 46 वर्षीय पुरुष, चोरे येथील 56 वर्षीय महिला,  वडगाव हवेली येथील 22 वर्षीय पुरुष, कपील येथील 47 वर्षीय पुरुष,सोमवार पेठ येथील 31 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, बेलदरे येथील 54 वर्षीय पुरुष, कोळे येथील 35 वर्षीय महिला, जींती येथील 40 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 34 वर्षीय महिला,शनिवार पेठ  61 वर्षीय पुरुष,गुरुवार पेठ 28 वर्षीय महिला,कार्वे 65 वर्षीय महिला,सोमवार पेठ 58 वर्षीय पुरुष 20,45 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल 42 वर्षीय पुरुष, शारदा क्लिनिक 51 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 13 वर्षीय बालीका, चोरे 35 वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली 46 वर्षीय पुरुष, कार्वे नका 47 वर्षीय महिला67 वर्षीय पुरुष, ओंढ 36 वर्षीय पुरुष,काले 30 वर्षीय महिला, इंदोली येथील 35 वर्षीय पुरुष, मलकापूर 28 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 20 वर्षीय महिला, कोळे 44 वर्षीय पुरुष,बनवडी 62 वर्षीय पुरुष,अहिल्यानगर मलकापूर 61 वर्षीय पुरुष, सैदापूर 38 वर्षीय महिला,आगाशिवनगर 35 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 50 वर्षीय पुरुष, हणबरवाडी 7 वर्षीय बालीका,येणके 46 वर्षीय पुरुष, मलकापूर 30 वर्षीय महिला,सोमवार पेठ 32 वर्षीय पुरुष 52 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 32 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 36,72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ 46 वर्षीय महिला, कार्वेनाका 74 वर्षीय पुरुष, कराड येथील 30, 35 वर्षीय पुरुष, गोटे 28 वर्षीय महिला, चोरे 33, 29 वर्षीय पुरुष, मसुर 57,43,32 वर्षीय महिला, किवळ 60  वर्षीय महिला 67, 31 वर्षीय पुरुष,कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 46 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 74 वर्षीय पुरुष, आटके येथील 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 55 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : स्कुल मोहोल्ला महाबळेश्वर येथील 7 वर्षीय बालीका 4 वर्षीय बालक 30 वर्षीय महिला 36,51 वर्षीय पुरुष,  गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष, गोगवे येथील 45 वर्षीय पुरुष, कोरेगांव : शांतीनगर येथील 30 वर्षीय पुरुष, हीवरे येथील 27 वर्षीय महिला, कोरेगांव येथील 42 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 58 वर्षीय पुरुष, अजिंक्य कॉलनी येथील 65 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 27 वर्षीय पुरुष, विद्यानगर 53 वर्षीय महिला व 22 वर्षीय पुरुष,, देऊर 60 वर्षीय महिला, पाटण : पाटण येथील 30 वर्षीय महिला, वजरोशी येथील28 वर्षीय महिला, गारवडे येथील 39 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 75 वर्षीय महिला, जमदाडवाडी 78 वर्षीय पुरुष, पाटण येथील 54 वर्षीय पुरुष, खटाव : वडुज येथील 69 ,55,28,24 वर्षीय महिला 56,21 वर्षीय पुरुष, पळसगाव 42 वर्षीय पुरुष, पुसेगांव 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष, पळशी 37 वर्षीय महिला, खंडाळा : धनगरवाडी येथील 37,34,37 वर्षीय पुरुष 30 वर्षीय महिला, लोणंद येथील 33,27 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष 4 वर्षीय बालक, शिवाजी चौक खंडाळा येथील 37, 31  वर्षीय पुरुष 37, 13,27 वर्षीय महिला 6 वर्षाचे बालक दिड वर्षाचे बालक, शिरवळ येथील 19,16 वर्षीय महिला 37 वर्षीय पुरुष, रेस्ट हाऊस खंडाळा येथील 57 वर्षीय  पुरुष, भैरोबावस्ती लोणंद 35 वर्षीय पुरुष, फलटण : कोळकी येथील 38 वर्षीय पुरुष 35 वर्षीय महिला 11 वर्षीय बालक,  रविवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 19 वर्षीय तरुण, धनगरवाडा 80 वर्षीय पुरुष, तामखड 55 वर्षीय पुरुष, मिरडे 50 वर्षीय पुरुष, जावली : मार्ली येथील 28 वर्षीय पुरुष, सरताळे येथील 38 वर्षीय पुरुष, माण : म्हसवड येथील 57,45 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, वाई : सह्याद्रीनगर येथील 11 वर्षीय बालीका तसेच जिल्ह्याबाहेरील पुणे खराडी येथील 7 वर्षीय बालक, जवाहरनगर करवीर येथील 17 वर्षीय बालक, वाणी आळी चिपळूण येथील 59 वर्षीय महिला असे कोरोनाबाधित आढळून आले. 

आणखी 261 जण बाधित
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 261 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र त्यांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड तालुक्यातील 27, खंडाळा तालुक्यातील 1, खटाव तालुक्यातील 1, महाबळेश्वर तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, सातारा तालुक्यातील 10, माण तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 6, वाई तालुक्यातील 5 अशा एकूण 53 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.

663 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 54, कराड येथील 12,  कोरेगाव 17, वाई येथील 63, शिरवळ येथील 88, रायगाव 6,  पानमळेवाडी येथील 130, मायणी येथील 60, महाबळेश्वर येथील 70,  पाटण येथील 17, खावली 39, ढेबेवाडी 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 90 अशा एकूण 663 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील यादोगोपाळ पेठ, सदरबझार (गोकर्ण अपार्टमेंट, उत्तेकरनगर), मंगळवार पेठ, चिमणपुरा पेठ (ढोणे कॉलनी), चिमणपुरा पेठ(श्री निवास समोरील रस्ता) तसेच तालुका हद्दीतील संभाजीनगर (बारावकरनगर), शाहूपुरी (गडकर आळी), वाढे (वाढेश्वरनगर), तासगाव (ब्राह्मणवाडी), समर्थनगर (निशीगंध कॉलनी) घोषित केले आहे.
error: Content is protected !!