कोरोनाचा कहर : 16 जणांनी गमावला जीव


दिवसभरात 248 जण पॉझिटिव्ह ; 296 कोरोनामुक्त

  सातारा,(भूमीशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून आज रविवारी तब्बल 16 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे तर आणखी 248 कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान,296 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

सोळा बाधितांचा मृत्यू 
क्रांतिसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कणुर ता.वाई येथील 80 वर्षीय पुरुष, वाठारा किरोली ता. कोरेगाव येथील 85 वर्षीय महिला, गोडोली ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, खोदाद ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, केसे ता. कराड येथील 64 वर्षीय पुरुष, विंग खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 65 वर्षीय महिला तसेच विविध खासगी रुग्णालयात कराडातील मंगळवार पेठेतील 68 वर्षीय पुरुष,  सणबुर ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 51 वर्षीय पुरुष, नवेचीवाडी ता. वाई येथील 55 वर्षीय पुरुष, सातार्‍यातील मंगळवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष,  गुरुवार पेठेतील 73 वर्षीय महिला, गडकर आळीतील 57 वर्षीय पुरुष, फुलेनगर ता. वाई येथील 55 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. पाटण येथील83 वर्षीय पुरुष अशा एकूण 16 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ.चव्हाण यांनी दिली.

शनिवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कोरोनाबाधित अहवालामध्ये फलटण : फलटण 1, मलठण 1, मांडव खडक 1, वाई : वाई शहरातील रविवार पेठ 11,  वाशिवली 1,  सह्याद्रीनगर 4,  यशवंतनगर 3, नवेचीवाडी 3,  ब्राम्हणशाही 2, फुलेनगर 6, सिध्दनाथवाडी 2 , दत्तनगर 1,  सोनगिरवाडी 3, बावधन 1, रामडोहाळी 2, चिखली 1, सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठ 7,  सातारा पोलीस स्टेशन 2, राजमाता सुमित्राराजे कॉलनी शाहूनगर 2,  शुक्रवार पेठ 1, देवी चौक 1,  प्रतापगंज पेठ 1, बुधवार नाका 2, सर्कल हाऊस 2,  बुधवार पेठ 1, सुर्यवंशी कॉलनी दौलतनगर (सातारा) 2,  गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, शाहूपूरी 1, गोडोली 1, लिंबाचीवाडी (नंदगाव) 1,  चिंचणेर निंब 2,  पिरवाडी 1, डबेवाडी 1, अतित 1, शहापूर 1, कोडोली 1, काशिळ 1, सातारा 1, सातारा शहर 2, कराड : कराड शहरातील मंगळवार पेठ 4,  सोमवार पेठ 6, कापील 2, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 3, बुधवार पेठ 1, कार्वे नाका 3, सह्याद्री हॉस्पीटल 1, मलकापूर 1, गजानन हौसिंग सोसायटी सैदापूर 1, पाल 1, मसूर 2, नांदगाव 1,  वारुंजी विमानतळ 1, कुसुर 1, विद्यानगर 1, ओंड 4,  सैदापूर 1, चचेगाव 1, किणी 1,  कोपर्डे हवेली 1, जखीणवाडी 1, शिरवडे 1, कराड 5, पाटण : माजगाव 2, पाटण  8, मल्हारपेठ 2, मारुल हवेली 6, ढेबेवाडी 3, सणबुर 1, गारवडे 2, महाबळेश्वर :  गवळी मोहाळा महाबळेश्वर 2, कोरेगाव :  कुमठे 11, कोरेगाव पोलीसस्टेशन 2, चवणेश्वर (करंजखोप) 3, खाटीक गल्ली रहिमतपूर 10, चिंचेचा मळा रहिमतपूर 1, वाठार किरोली 1, खटाव : मोरोळे 2,  वडूज 2, पुसेगाव 1, मायणी 2, डांभेवाडी 3, राजाचे कुर्ले 4, माण : भालवडी 3, म्हसवड 1, जावळी : मोरघर 1, खंडाळा : मारुती मंदीराजवळ- वाण्याचीवाडी 1,  इतर जिल्हा- कलमवाडी (वाळवा-सांगली) 2, अंबक (कडेगाव-सांगली), डोंबिवली 1(ठाणे जिल्हा) असे कोरोनाबाधित आढळून आले.

आणखी 248 जण बाधित
रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 248 जण कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 28 बाधितांचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालामध्ये महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील गवळी मोहल्ला 1,नगरपालिका 4, महाबळेश्वर 1, स्कूल मोहल्ला महाबळेश्वर 1, मेटगुताड 2, कराड : शिंगणवाडी 1, फलटण : मारवाड पेठ 5, मंगळवार पेठ 3, मलवडी 1, मुंजवडी 1, मुरुम 1,  नांदल 1, आदर्की 2,  रविवार पेठ 1, बिरदेवनगर 1, शुक्रवार पेठ 2 यांचा समावेश आहे. मात्र उर्वरीत 220 कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होऊ शकला नाही. 

296 नागरिकांना डिस्चार्ज
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 51, खंडाळा तालुक्यातील 26, खटाव तालुक्यातील 27, कोरेगांव तालुक्यातील 45, महाबळेश्वर तालुक्यातील 8, माण 1, पाटण तालुक्यातील 21, फलटण तालुक्यातील 24, सातारा तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 53 अशा 296 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

140 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 55, फलटण 15, पानमळेवाडी 8, महाबळेश्वर 5, मायणी 57 असे एकूण 140 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील राजसपुरा पेठ (आरके हाईटस), मल्हार पेठ (जगताप कॉलनी), गोडोली (एस. टी. कॉलनी, शाहूनगर), बुधवार पेठ (कच्छी प्राईड), व्यंकटपुरा पेठ (महागणपती अपार्टमेंट),  शुक्रवार पेठ (सुर्या कॉम्प्लेक्स), पोलीस लाईन, दुर्गा पेठ, शुक्रवार पेठ (जिजामाता कॉलनी) तसेच तालुका हद्दीतील खेड (गोकुळनगर)(न्यू विकासनगर) या परिसरात प्रांत मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
error: Content is protected !!