कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबेना !


दिवसभरात 107 पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबेनासा झालाय.रविवारीही जिल्ह्यात 107 जणांना कोरोनाची बाधा झाली तर एकाचा मृत्यू झाला.  तर 19 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन  प्रशासनाने तातडीने तपासणी करण्यासाठी अँटिजन किटची मागणी केली होती.शासनाकडून किट  उपलब्ध करण्यात आले असून त्याचा वापर  जिल्ह्यातील रुग्णालयांत सुरू करण्यात आला आहे. यामुळे  तपासणी केल्यानंतर तात्काळ रिपोर्ट समजणार असून पॉझिटिव्ह आलेल्यांवर पुढील उपचार करण्यास मदत होणार आहे.

एका बाधिताचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शिरवळ ता. खंडाळा येथील 90 वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

शनिवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे 
वाई:
धर्मपुरी येथील 27, 49 वर्षीय पुरुष, पोलिस वसाहत येथील 65, 4, 30, 4, 18 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, सिद्धांतवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, बोपेगाव येथील 51 वर्षीय महिला, शेेंदुरजने 39, 40 वर्षीय पुरुष, सातारा: जिहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10, 8 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला, कण्हेर येथील 40, 45, 35 वर्षीय महिला, कराड : शामगांव येथील 53 वर्षीय पुरूष, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 38 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, चचेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, तारुख येथील 2, 2 वर्षीय बालिका, सैदापूर येथील 54 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष, खंडाळा: जावळे येथील 57 वर्षीय पुरुष, कोरेगांव: अनपटवाडी येथील 1, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 31, 22 वर्षीय पुरुष, खटाव: वडूज येथील 29 वर्षीय पुरुष, डिस्कळ येथील पुरुष, पाटण: तारळे येथील 25 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, मिरगांव येथील 18 वर्षीय महिला, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय पुरुष, आंमवडे येथील 15 वर्षीय पुरुष, 25, 65 वर्षीय महिला, फलटण: चव्हाणवाडी येथील 53, 25 वर्षीय पुरुष, 42, 22 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 43, 15, 50, 16 वर्षीय पुरुष, 38, 43, 18, 65 वर्षीय महिला, उपळवे येथील 26 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, महतगल्ली येथील 45 वर्षीय पुरुष, माण: राजवडी येथील 37 वर्षीय पुरुष, 28, 12 वर्षीय महिला, गोंदवले (बु) येथील 21 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 83 वर्षीय पुरुष असे 67 कोरोनाबाधित आढळले. 

आणखी 107 जण पॉझिटिव्ह
रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 107 कोरोनाबाधित आढळले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2387 वर  पोहोचली आहे.

19 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 19 नागरिकांना दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
सातारा: जिहे येथील 19  वर्षीय तरुण व 80 वर्षीय महिला, राधिका रोड सातारा येथील 27,30,48 व 81 वर्षीय महिला, कन्हेर येथील 65 वर्षीय महिला, बोरगाव येथील 44 वर्षीय महिला, खटाव: वडुज येथील 22 वर्षीय तरुण, वरुड येथील 25 वर्षीय तरुण, माण: गोंदवले बु. येथील 20 व 24 वर्षीय तरुणी व 16 व 27 वर्षीय तरुण, मार्डी येथील 60 वर्षीय महिला, वाई: पसरणी येथील दोन पुरुष,वाई येथील एक पुरुष व महिला अशा 19 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

error: Content is protected !!