कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा वाढतोय !


जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू; 121 जण पॉझिटिव्ह

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. कोरोनामुळे आज बुधवारी दिवसभरात 7 जणांना आपला जीव गमवावा  लागला. मृत्यूंची एकूण संख्या आता 94 वर जाऊनपोहोचली आहे. आज आणखी 121 जण पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, 57 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

कराड येथील खासगी हॉस्पिटल येथे बुधवार पेठेतील 53 वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे अहिरे ता. खंडाळा येथील 77 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील गुरुवार पेठ येथील 72 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड  येथील 65 वर्षीय पुरुष, एकसळ ता. कोरेगाव येथील 66 वर्षीय पुरुष तसेच क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बापूजी साळुंखेनगर कराड येथील 37 वर्षीय पुरुष व चितळी ता. खटाव येथील 28 वर्षीय पुरुष अशा 7 कोरोनाबाधितांंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
कालवडे येथील 60, 65, 40 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 45 वर्षीय महिला, टेंभू येथील 40 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 24 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय महिला, शामगाव येथील 76 वर्षीय पुरुष, रेठरे येथील 29 वर्षीय पुरुष, रेठरे बु. येथील 26, 60 वर्षीय पुरुष, पाटण : तालुक्यातील माहिंद येथील 55 वर्षीय महिला, खाले येथील 31 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, तारळे येथील 22 वर्षीय महिला, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष, कोरेगांव : तालुक्यातील बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 61, 63, 37, 48, 27, 37 वर्षीय महिला व 39 व 63 वर्षीय पुरुष, सातारा : सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, जिहे येथील 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 55, 46 वर्षीय पुरुष, देगांवरोड येथील 39 वर्षीय पुरुष, शांतीनगर येथील 52 वर्षीय पुरुष, माण : तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष, आंधळी येथील 60 वर्षीय पुरुष, फलटण : शिवाजी नगर येथील 32 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान येथील 29 व 24 वर्षीय महिला, कोळकी येथील 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचा बालक, 33, 60 वर्षाची महिला व 3 वर्षाची बालीका, जिंती नाका येथील 36 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 33 वर्षीय महिलाव 58 वर्षीय पुरुष, खटाव : अंबवडे येथील 27 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष, खतगुण येथील 85 वर्षीय महिला, वाई : भूईंज येथील 32 वर्षीय पुरुष, परखंडी येथील 57 वर्षीय महिला व 37 वर्षीय पुरुष व 11 वर्षाचे बालक,  पसरणी येथील 67 वर्षीय महिला,  11 व 14 वर्षीय बालक व 36,76,39 वर्षीय पुरुष, वाई येथील 40 वर्षीय पुरुष व 63 वर्षीय महिला, परखंडी येथील 70 वर्षीय दोन पुरुष,सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष,  महाबळेश्वर : पाचगणी येथील 52 वर्षीय पुरुष, गोडवली (पाचगणी) येथील 40,23 वर्षीय पुरुष व 13 व 17 वर्षीय बालक, जावली :  तालुक्यातील सायगाव येथील 22, 34  वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, 57 वर्षीय पुरुष,  खंडाळा :  विंग येथील 34 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 37,28 वर्षीय पुरुष 10 वर्षाची बालीका, खंडाळा येथील 34 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक व 8 वर्षाची बालीका, काझी कॉलनी शिरवळ येथील 39 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 55 वर्षीय महिला, मावशी येथील 41,65 वर्षीय महिला असे 86 जण कोरोनाबाधित आढळले.

आणखी  121 जण पॉझिटिव्ह
कोरोनाबाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड शहरातील शुक्रवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 31 वर्षीय महिला, सवादे येथील 38 वर्षीय पुरुष,  वडगाव हवेली येथील 35 वर्षीय महिला, व 49 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 42, 45 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, कोडोली येथील 31 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिला असे 12 जण तसेच जिल्हा रुग्णालय सातारा येथे रॅपिड अ‍ॅन्टीजंट टेस्टद्वारे तपासणी करण्यात आलेल्यांपैकी  शामगाव ता. कराड येथील 1 व कराड येथील 1 असे दोनजण त्याचबरोबर बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 105 असे एकूण दिवसभरात 121 जण कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 105 बाधितांचा तपशील रात्री प्राप्त होऊ शकला नाही.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
जावली : पूनवडी येथील वय  12, 5, 34, 55, 34 वर्षीय पुरुष व वय 33, 12, 55, 12, 45, 50, 18 व 45 वर्षीय महिला,  सरताळे येथील 50 वर्षीय पुरुष., खंडाळा :  शिरवळ येथील 14,62, 34, 27 वर्षीय पुरुष व 22, 65, 28 वर्षीय महिला., सातारा :  शहरातील बुधवार पेठेतील 12 व 13 वर्षीय मुलगे, यादोगोपाळ पेठेतील 40 वर्षीय पुरुष, मंगळाई कॉलनीतील 34 वर्षीय पुरुष व 56, 37 वर्षीय महिला, सातारा येथील 63 वर्षीय महिला, जिहे येथील वय 50, 72, 42, 69, 19, 24 वर्षीय पुरुष व वय 66, 57, 39, 80, 32, 19, 50 वर्षीय महिला, शहापूर येथील 45 वर्षीय महिला, करंडी येथील 48 वर्षीय पुरुष,19 व 44 वर्षीय महिला., कराड :  बनवडी येथील 35 व 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 37 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पीटल कराड येथील 31 वर्षीय पुरुष, पंचायत समिती कराड येथील 50 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील 72 व 41 वर्षीय पुरुष., पाटण : कासाणी येथील 40, 15 वर्षीय महिला 14, 25 वर्षीय पुरुष अशा 57 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला.

595 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 24, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 46, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 32, वाई येथील 81, शिरवळ येथील 46, रायगाव येथील 47, पानमळेवाडी येथील 71, मायणी येथील 38, पाटण येथील 27, दहिवडी येथील 32, खावली येथील 70 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 54 असे एकूण 595 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा तालुका हद्दीतील शाहूपुरी (रामकुंड), शाहूनगर (जगतापवाडी) या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केले आहे. 
error: Content is protected !!