सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भल्या पहाटेच्या वातावरणात छत्रपती शाहू महाराजांचा जयघोषात, तुताऱयांच्या निनादात, सनईचा मंजूळ स्वर, हलगीच्या वादनाने किल्ले अजिंक्यताऱयावरील राजसदरेवर वातावरण शिवभय झाले होते. निमित्त होते छत्रपती शाहु महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळय़ाचे. शिवभक्त, शाहुभक्तांनी किल्याच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शाहु महाराजांची दहा वर्षापूर्वी ठरवल्याप्रमाणे पालखी जयघोषात फुलांच्या वर्षावात गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात आसमंत दणाणून सोडत विसावली. 2032 साली चांदीच्या पालखीत सोन्याची छ. शाहु महाराजांच्या मूर्तीसह पालखी सोहळा करण्याचा संकल्ल्प या दिनी करण्यात आला.
गेली 12 वर्षांपासून शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने छत्रपती शाहु महाराजांचा राज्यभिषेक सोहळा किल्ले अजिंक्यताऱयावर साजरा करण्यात येतो आहे.
याही वर्षी प्रथेप्रमाणे उत्साही वातावरणात शाहु महाराजांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजममुंडे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, संतोष शेडगे, दत्ताजी भोसले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, संग्राम बर्गे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदामदादा गायकवाड, महेश पाटील, शरद पवार, वक्ते निलेश झोरे, सचिन जगताप, ऍड. विनीत पाटील, युवा करिअर ऍकॅडमीचे विश्वास मोरे, एलबीएस कॉलेजचे महेश गायकवाड, ऍड. अरविंद कदम, मंगेश काशिद, रवी पवार, प्रकाश घुले, गणेश दुबळे, संतोष लोहार, राजवी हलगेकर, मनीषा फरांदे, उर्मिला भोजने, आदी मान्यवर उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.