कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च पर्यंत कडक निर्बंध

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्या आहेत. विविध क्षेत्रांसाठी कडक नियम लागू करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वा. पासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा  चालू राहतील.  सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंन्स्टिेट्युट (कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्युट, तसेच इयत्ता 5 ते 12 चे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषत: आंतरराष्ट्रीय यविद्यार्थ्यांचे वसतीगृह वगळून) या बंद राहतील.

 ऑनलाईन, दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील, ऑनलाईन शिक्षण, दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी शिक्षण विभागाने आरोग्य व सुरक्षेततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन, दुरस्थ शिक्षण प्राधान्यप्राप्त अध्यापानाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी केवळ उच्च शिक्षण संस्था (पी. एच.डी) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रावाहातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील, प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील. केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाल्यानंतरच प्रयोगाशाळा, पयोगात्मक कामांसाठी विद्यार्थ्यांना बोलावण्यास परवानगी राहील. इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे, इत्यादी ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्राज्ञानातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील, प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील. सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर रव स्वच्छतेचे पालन करुन काम करण्याची परवानगी राहील.

  यशदा, वनमती, मित्र, एमईआरआय इत्यादी विविध सरकारी ऑफलाईन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात उघडण्यास परवानगी असेल. संबंधित प्रशासकीय विभागामर्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतुक काही  ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोस्युजर नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

          

       

error: Content is protected !!