सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा)ः देशात १६ जानेवारीपासून कोविड १९ च्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यानुसार सिरम इन्स्टिट्युटच्यावतीने देशभरात लसीचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार आज पहाटे साताऱ्यात लसीची व्हॅन दाखल झाली.
गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले होते. यात अनेकांना जीव गमवावे. काही लोकांचा रोजगार झाला. त्यामुळे कोरोनाची लस कधी येणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिले होते. अनेक कंपन्या लसीचे संशोधन करीत होत्या. त्यापैकी सिरम इन्सिट्युटने निर्माण केलेल्या लसीला शासनाने मान्यता दिली. या लसीचे देशभऱ वितरण सुरू आहे.
सातारा जिल्ह्यासाठी ३० हजार डोस पहाटे साताऱ्यात दाखल झाले. याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्विकार करण्यात आला. कोविड अॅपवर ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना या लसीचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यात ४ हजार ४१७, फलटण १ हजार ९६३, माण १ हजार ४०४, पाटण १ हजार ७३२, कोरेगाव १ हजार ५६७, महाबळेश्वर ७१५, वाई १ हजार ४८३, खंडाळा ९०९, कराड ७ हजार ६९३, जावली ९०४ अशा एकूण २५ हजार ४१० कोरोना योध्दांना लस दिली जाणार आहे. ही लस जिल्ह्यातील ११ ठिकाणी दिली जाणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण, ग्रामीण रुग्णालय पाटण, खंडाळा, माण, कोरेगाव, कृष्णा हाॅस्पीटल, मायणी मेडिकल काॅलेज, मिशन हाॅस्पीटल वाई व नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण होणार आहे.
You must be logged in to post a comment.