सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाची तिसरी काय किंवा चौथी लाट आली तरी, कोरेगाव मतदारसंघातील जनतेला घाबरण्याची भीती नाही. जनतेने आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य दूत निवडून दिला आहे, काडसिध्देश्वर कोविड हॉस्पिटलद्वारे कोरोनावर निश्चितपणे मात करु, असा विश्वास गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चातून कोरेगावत नव्याने सुरु केलेल्या काडसिध्देश्वर कोविड हॉस्पिटलचे उदघाटन देसाई यांच्या हस्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मुकुंद आफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार महेश शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, किरण
बर्गे, सुनील खत्री, राहूल प्र. बर्गे, राजाभाऊ बर्गे, संदीप शिंदे, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, खटावे उपसरपंच राहूल पाटील, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, डॉ. युवराज करपे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळुखे उपस्थित होते.
देसाई पुढे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेत क्षणाचाही विलंब न
लावता, आमदार महेश शिंदे यांनी केवळ चार ते पाच दिवसात सर्वात मोठे मोफत
कोविड हॉस्पिटल उभे केले. सद्यस्थितीत कोरेगावात १८० ऑक्सिजन बेड्स झाले
आहेत, त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होणार
नाही, त्यांना वेळेत उपचार मिळणार आहेत,
कोविड हॉस्पिटलच्या शुभारंभानंतर काही मिनिटातच ३१ रुग्ण तेथे दाखल झाले
असून, त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. एकाचवेळी शंभरपेक्षा
जास्त रुग्ण आले तरी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जाणार असून,
कोरोनाग्रस्त प्रत्येक रुग्णावर मोफतच उपचार केला जाणार असून,त्यामध्ये
कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.
You must be logged in to post a comment.