साताऱ्यात सोमवारपासून कोविड टास्क फोर्स सक्रिय


सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : घातक अशा ओमायक्रॉन विषाणूने महाराष्ट्राच्या वेशीवर दस्तक दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टचे आदेश दिल्यानंतर सातारा पालिकेचा टास्क फोर्स सक्रीय झाला आहे. येत्या सोमवारपासून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पाचशे रूपये दंड आणि दुकानांची नियमित तपासणी इं मोहिम सुरू केली जाणार आहे.


सातारा जिल्हा लसीकरणाच्या उद्दिष्टाबाबत राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 91.5 टक्के लसीकरण झाले आहे. द. आफ्रिका खंडात भयकंप निर्माण करणारा ओमायक्रॉन भारतात पोहचल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकात दोन रुग्ण बाधित आढळल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. मात्र मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगची सतर्कता साताऱ्यात दिसेनासी झाली आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आरोग्य यंत्रणेला टास्क फोर्स उभारण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सातारा पालिकेने सक्रियता दाखवली आहे.   सध्या पालिकेच्या करोना कक्ष प्रमुख प्रणव पवार व एक शिपाई हे दोनच कर्मचारी या विभागात सक्रीय आहेत.

येत्या सोमवारपासून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया आणि दुकान तपासणीची मोहिम सुरू केली जाणार असल्याचे प्रणव पवार यांनी सांगितले. 000

error: Content is protected !!