सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या नागरिकांनी पूर्वी कोविशील्ड या लसीचा पाहिला डोस घेतला आहे. त्यांना दि. 15 मे पासून कोविशील्ड या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवड्याच्या दरम्यान (84 ते 112 दिवस ) देण्यात येणार आहे. याबाबतचा बदल कोविन ॲप मध्ये दि. 14 मे च्या मध्यरात्री पासून करण्यात येणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
कोवॉक्सीनच्या पहिल्या व दुसऱ्या डोसच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसुन त्याचे लसिकरण पूर्वी प्रमाणेच सुरु राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी ज्यांचा कोविशील्ड या लसीचा पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी पुढील दुसरा डोस घेण्याकरीता लसिकरण केंद्रावर जावे. परंतु ज्यांचे 84 दिवस पूर्ण झालेले नाहीत त्यांनी लसिकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करु नये असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.