लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांग

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. लोक भितीच्या छायेखाली आहेत. लॉकडाऊन आणि लसीचा अपुरा पुरवठा यामुळे लोक त्रस्त आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांग पाहायला मिळाली आहे.

लस मिळवण्यासाठी मध्यरात्रीपासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे आहेत. राज्यभरात लसींचा तुटवडा जाणवत असतानाच लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक लसीकरण केंद्राकडे वळत आहेत. सातारच्या स्थितीवरुन त्याचा अंदाज येत आहे. सध्या राज्यात कोरोना लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक होत असल्याने नागरिकांत भीती आहे.

सातारा शहरात मध्यरात्री साडेतीन वाजल्यापासून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. याठिकाणी लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मध्यरात्री रांगा लावत आहेत. सकाळी सहा वाजेपर्यंत 200 हून अधिक नागरिक लसीकरणाच्या सांगत होते. त्यामुळे एका लसीसाठी तब्बल सात आठ तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

एकीकडे लस मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची फरफट होत असल्याचे चित्र आहे तर काही राजकीय पुढारी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वशेलिबाजी करत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता लस घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव दहा ते बारा तास खर्ची घालण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!