सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक लसीकरण केंद्रात कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. सध्या सातारा जिल्हा रुग्णालयात १८ वर्षे वरील लोकांना लस दिली जात आहे. मात्र, लस केवळ २०० लोकांना दिली जात असल्याने लसीचा डोस मिळण्यासाठी लोकांना रात्रीपासून रांगा लावाव्या लागत आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती. ज्या ठिकाणी लस उपलब्ध आहे त्या ठिकाणी नागरिकांनी लस संपेल या भीतीने गर्दी केलेली पाहायला मिळालं. जिल्हा रुग्णालयात सकाळ पासून शेकडो नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी रांग लावली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरण चालू होते. मात्र आज २०० लस दिल्यानंतर दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान लसीचा साठा संपल्याने बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. दुपारीपर्यंत उपलब्ध असलेल्या शंभर जणांना लस दिल्यानंतर लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना लस न घेताच घरी परतावे लागले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी आधीच्या रात्री पासूनच सातारकर नंबरला उभे राहण्यासाठी गर्दी करत आहेत . १८ ते ४४ वयातील लसिकरणासाठी जवळ जवळ १५० ते २०० लोक रात्रीच्या वेळी नंबरसाठी थांबले गेल्याचे पहावयास मिळत आहेत .काही जण तर येथे झोपण्यासाठी चादर घेऊन येत आहेत . सकाळी येणाऱ्या नागरिकांना नंबरला लागलेली रांग पाहुनच विना लस घेताच घर गाठावे लागत आहे . रात्री पासुन गर्दी होत असल्याने या गर्दीतच कोरोना संक्रमण होण्यास एकप्रकारे वाव मिळत आहे . प्रशासनाने या नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली नाही प्रत्येक जण आपापल्या परीने रांगेत जागा कशी उपलब्ध होईल यासाठीच प्रयत्न करीत आहे . कोणत्याही प्रकारचे डिस्टनसिंग पाळत नसल्याचे चित्र नागरिकांमधून दिसुन येत आहे . प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन नागरिकांना रात्रीच्या वेळी कोरोना नियमावली प्रमाणे या ठिकाणी नंबरला उभे राहण्यासाठी भाग पाडावे. अन्यथा याच ठिकाणी कोरोना संक्रमण वाढीस लागणार यात तिळमात्र शंका नाही .
You must be logged in to post a comment.