साताऱ्यात १५ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा ३०० ते ५०० दरम्यान, आढळून येत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी १५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच १५ एप्रिलपर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973  चे कलम 144 नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने केलेल्या उपाययोजनांमध्येजिल्हयात रात्रीचे 08.00 वाजलेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील. इयत्ता 9 वी पर्यंत सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्सिटयुट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट बंद राहतील. तथापी, निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह, इयत्ता 10 वी व त्यापुढील सर्व वर्ग, महाविदयालये,  शैक्षणिक संस्था चालू ठेवणेस परवानगी असेल.  ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील.  ऑनलाईन शिक्षण आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी  शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षीततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  

error: Content is protected !!