उत्तर कोरेगावमध्ये गारपीठ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दोन तास पडलेल्या गारांच्या पावसाने जिकडेतिकडे बर्फच दिसत होता. या गारपीठीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरेगाव तालुक्यातील भाडळे, वाठार, पिंपोडे परिसरात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. गारांच्या पावसाने परिसरातील अनेक गावांचे संपूर्ण शेतशिवार रस्त्यावर बर्फ़ाचा खच साचला होता. सातारा लोणंद रस्ता बर्फाने माखून गेला होता. रस्त्यावर पडलेल्या बर्फाच्या खचातुन मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होते. हा बर्फ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

या गारपीठीमुळे मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कलिंगड, कांदा बीजोत्पादन, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!