नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर फुलले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पाटर्याचे  सर्वत्र वातावरण असले तरी ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढू  लागल्याने आणि वाढत्या संकटामुळे राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. ते शुक्रवारी मध्यरात्रीपासून लगेच लागू झाले आहेत. त्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.यामुळे महाबळेश्वर मधील काही मोठमोठ्या हॅोटेल मधील आरक्षण रद्द झाली तर काही हॅोटेलाची थीम बदलण्यात आल्या नारज पर्यटकाची पाऊले कोकणातून पुन्हा महाबळेश्वर कडे वळू लागली
       

महाबळेश्वर नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरनगरी सज्ज झाली असून, येथे पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. तसेच वेण्णालेक परिसरात नौकाविहाराचा आनंद लुटण्यासोबतच पर्यटक चटपटीत पदार्थांवर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरात जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
           

 महाराष्ट्राचे प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये नाताळ शनिवार रविवार सलग आलेल्या सुट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल होत आहेत. पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी परिसर सुशोभित करण्यात आला आहे. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिकांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईसह बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने बाजारपेठेला नवी ‘झळाळी’ मिळाली आहे. तसेच महाबळेश्वर नामांकित पॅाईटवर पर्यटक ‘सेल्फी’ घेताना पाहावयास मिळत आहेत.
   

   येथील प्रसिद्ध वस्तूंच्या पदार्थाच्या खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. परिसरातील प्रसिद्ध ऑर्थरसीट केट्स पॅाईट लॉडविक पॅाईट या प्रेक्षणीय स्थळांसह माचूतर येथील गणपती मंदिरामागील प्लेटो पॅाईट (राजाची खुर्ची) व लिंगमाळा धबधबा यासारखी स्थळेदेखील पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. तसेच प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.किल्ले प्रतापगड व हस्तकला केंद्र येथे देखील पर्यटकांची रेलचेल दिसत आहे. वेण्णालेक, मुंबई पॉईंट या परिसरामध्ये घोडेसवारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरचे वैभव असलेल्या वेण्णालेकला चौपाटीचे स्वरूप आले आहे. हा संपूर्ण परिसर सायंकाळी फुलून जात आहे. पर्यटक नौकाविहारासोबतच चटपटीत पदार्थावर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम आहे. खवय्यांसाठी स्ट्रॉबेरी पासून बनवलेली विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी या व अशा पदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत. विविध गेम्सबरोबरच घोडेसवारीचा आनंद देखील पर्यटक लुटत आहेत. वेण्णालेकवरील निसर्गसौंदर्य व सूर्यास्तावेळी दिसणाऱ्या निसर्गाच्या छटा पर्यटक अनुभवत आहेत.

error: Content is protected !!