पिंपोडे ग्रामीण रूग्णालयाची जमावाकडून तोडफोड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथिल जिल्हा ग्रामिण रुग्णालयात मृत व्यक्तीचे नातलग व जमावाने रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना घडली.

वाघोली (ता. कोरेगाव) येथील रोहित पोपट शिंदे (वय- २0 ) या युवकाने गळफास घेतल्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या युवकाला वाघोली येथील काही युवक व नातेवाईक उपचारांसाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.तेव्हा त्याठिकाणी नातेवाईकांच्या जमावाने गोंधळ घातला.

त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडल्या, सॅनिटायझर मशीन फोडले, महिला प्रसूती गृहाच्या खोलीचा दरवाजा फोडला, तसेच दवाखान्यात प्रचंड गोंधळ घातला. रुग्ण सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांना जमावाने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.

error: Content is protected !!