कांबिरवाडी येथे सिलिंडरचा स्फोट, चारजण जखमी

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कांबिरवाडी ता. कऱ्हाड येथे गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले तर स्फोटाने घरामधील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवार, दि. २४ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

दीपक तानाजी कचरे (वय ४०), भारती दीपक कचरे (३४), प्रेमनाथ दीपक कचरे (१२) प्रणाली दीपक कचरे ( ९ ) असे सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्याची नावे आहे. जखमींना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

error: Content is protected !!